Kondhwa, Pune: कोंढव्यातील पालिकेचे हॉस्पिटल व भाजी मार्केट सुरु करण्यासाठी शिवसेनचा यलगार

M.Babar3_
Share This News

महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन

पुणे (प्रतिनिधी)
पुणे महापालिकेच्या निधीतून कोट्यावधी रुपये खर्च करून कोंढव्यात हॉस्पिटल व भाजी मार्केट बांधण्यात आले मोठा गाजावाजा करत उद्घाटन करूनही हे प्रकल्प सामान्यांसाठी खुले करण्यात न आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मोफत भाजी वाटून निषेध आंदोलन करण्यात आले.

https://fb.watch/h5k6FKrQY6/

Balwadkar

माँ खदीजा प्रसूतीगृह दवाखाना, हजरत अब्दुल रहमान ओटा मार्केट पुणे महापालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते, हॉस्पिटलमध्ये फक्त ओपीडी चालू केली आणि भाजी मार्केट चालू झालेच नाही या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार शिवसेनेचे नेते महादेव बाबर यांनी केले

IMG-20250324-WA0012

याप्रसंगी हडपसर विभागप्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेविका मेधा बाबर, माजी नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, युवा नेतृत्व प्रसाद बाबर, आसमा खान, महेंद्र भोजने, संजय सपकाळ, सचिन कापरे, अमर कामठे मकरंद केदारी अशोक पवार, अशोक लोणकर, प्रदीप पवार, गणेश कामठे, सचिन कामठे, नदीम शेख, शहबाज पंजाबी, हुसेन शेख, हाजी हुसेन शेख रहीम शेख, प्रदीप पवार, श्रीकांत पवार,विकास बधे, अनिल जगताप, पुष्पा निकम, सविता गोसावी, शरिफा सय्यद यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी उपस्थित नागरिकांना मोफत भाजीचे वाटप करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसेच प्रतिकात्मक डॉक्टर व रुग्ण बनवून यावेळी रस्त्यावरच उपचार करत आता तरी महापालिका अधिकाऱ्यांनी डोळे उघडावेत व हॉस्पिटल सुरू करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.

महापालिकेच्या निधीतून या ठिकाणी हॉस्पिटल व ओटा मार्केट बांधण्यात आले असून करोडो रुपये खर्चूनही ही वास्तू धुळखात पडून आहे दोन महिन्यात दोन्ही वास्तू पूर्णपणे चालू केल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेत आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा महादेव बाबर यांनी यावेळी दिला.

राजेंद्र बाबर, प्रसाद बाबर, मेधा बाबर, यांनी यावेळी आपल्या भाषणात महापालिका प्रशासन व माजी नगरसेवकांवर जोरदार टीका केली.

Follow this link to join my WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/KSk73FAmlH78ARQf02T9dG

IMG-20250820-WA0009
85856