SNBP Group Of Institute: एसएनबीपी’ चे संस्थापक डॉ. डी. के. भोसले यांचा मॉरिशसमध्ये सन्मान

Share This News

पुणे येथील नामांकित शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. डी. के. भोसले यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच मॉरिशस येथे ‘एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

६ ऑक्टोबरला मॉरिशस येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मॉरिशस प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहिम पृथ्वीराजसिंह पूपन आणि उपपंतप्रधान लीला देवी डोकुन- लच्छुमन यांच्या हस्ते शिक्षणातील उत्कृष्टता पुरस्कार २०२२ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ डी. के. भोसले यांना प्रदान करण्यात आला.

[ad id=’19444′]

या कार्यक्रमास एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या संचालिका अँड. ऋतुजा भोसले यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान डॉ डी. के. भोसले यांनी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या पुण्यातील
ठिकठिकाणी असलेल्या शाखांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित विविध क्रीडा प्रकारचा प्रसार केला. तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण केली .त्या माध्यमातून क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्याचे विशेष कौतुक करत पृथ्वीराजसिंह पूपन यांनी डॉ. भोसले यांचा सन्मान केला.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या पुरस्काराने जबाबदारी वाढली असुन आगामी काळात या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आधिक चांगल्या दर्जाचे काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना यावेळी डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.