Yerwada, Pune: येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये बदल

Share This News

पुणे, दि.१ : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी गेट ते कुमार कृती सोसायटीपर्यंत चारचाकी व दुचाकी करीता संपूर्ण समांतर पार्किंग करण्यात येत आहे.

याबाबत नागरिकांनी आपल्या सुचना असल्यास पोलीस उपआयुक्त,वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २० सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरुपात कळवावे.

[ad id=’18973′]

Balwadkar

नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी) वाहनांना हे आदेश लागू नसतील असे वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

IMG-20250324-WA0012
IMG-20250820-WA0009
85856