Diwali Pahat: पिंपळे सौदागरात रंगली दिवाळी पहाटची सुरेल मैफिल

Share This News

दिवाळी निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे   शनिवार दि २२ ऑक्टोबर आणि २३ ऑक्टोबर रोजी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “स्वरामृत दिवाळी पहाट” चे आयोजन करण्यात आले होते . पिंपळे सौदागर रहिवासीयांनी या “स्वरामृत दिवाळी पहाट” कार्यक्रमात प्रथमेश लघाटे , अनुराधाताई पटवर्धन , कार्तिकी गायकवाड आणि पंडितजी गायकवाड या दिग्गज गायक गायिकांच्या सुमधुर गाण्यांची मेजवानी लाभली तसेच संगीत संयोजक श्री गणेश गायकवाड , व्हायोलिन वादक श्री अपुर्व गोखले , हार्मोनियम वादक श्री प्रवीण कासलीकर , तबला वादक श्री किशोर कोरडे , पखवाज श्री राजेंद्र बघे , बासरी वादक श्री निलेश बुंदे यांनी आपला वाद्यांचा ठेका धरत सर्वाना मंत्रमुग्ध केले . 

[ad id=’19444′]

दिवाळी पहाटचे स्वागत सुरांच्या मैफलीने साजरे करण्याचा इतिहास फार जुना आहे. मराठी चित्रपट संगीत, सुमग संगीत , भावसंगीत, नाटय़संगीत, लोकगीते ते अगदी शास्त्रीय संगीताच्या मैफली पहाटे रंगू लागल्या आहेत आणि यासाठी रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिग्गज गायकांसह नवोदित गायकांचा सहभाग हे या मैफलींचे वैशिष्टय़ म्हणता येईल. “स्वरामृत दिवाळी पहाट” च्या माध्यमातून एखाद्या मान्यवर गायकाला प्रत्यक्ष ऐकणे आणि त्याच्या सुरांची जादू अनुभविणे यात एक वेगळ्याच आनंदाचा अनुभव पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना आला .आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात दिवाळी पहाट सारख्या आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे काम या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडले. सकाळी ५ वाजता सुरू झालेल्या या ‘स्वरामृत दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड गर्दी करून भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी पिंपळे सौदागर रहिवासी , समस्त पिंपळे सौदागर ग्रामस्थ ,  शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन सदस्य , उन्नती सोशल फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.