Nationalist Congress Party: राष्ट्रवादीकडून पुणे स्टेशन समोरील भुयारी मार्गाच्या गाळेधारकांच्या नुकसानाची पाहणी

Share This News

यावर्षीच्या पावसाने पुण्यातील पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपच्या भष्ट्राचाराची पोलखोलच केली परंतु यामुळे पुणेकरांना मात्र अतोनात हाल सहन करावे लागले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने पुण्यातील काही भागांमध्ये परवाच्या पावसामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी केली पुणे स्टेशन समोरील भुयारी मार्गाच्या आतील असलेल्या गाळेधारकांचे परवाच्या पावसामुळे अत्यंत नुकसान झालेले आहे त्यांचा माल पावसामुळे खराब झालेला आहे तसेच वारंवार प्रशासनास विनंती करून सुध्दा तेथे कोणीही मदतीस आलेले न्हवते स्वच्छते करीताही खुप वेळा विनवण्या कराव्या लागल्या त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता अद्यापही कोणी आलेले नाही , महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी भाडे /टॅक्स घेतले जाते मात्र त्यांच्या समस्यांकरता नीट लक्ष दिले जात नाही अशी तक्रार तेथील सर्व व्यापाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली

[ad id=’19505′]


सदर ह्या छोट्या गाळेघारकांच्या मागण्या आयुक्तांकडे दूरध्वनीवर मांडून त्या त्वरीत सोडविण्याची मागणी केली तसेच त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर आज आयुक्तांचीही भेट घेणार आहोत
सदर शिष्टमंडळात प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख ,दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे , मयुर गायकवाड , अजिंक्य पालकर महेश हांडे , शशिकांत जगताप , गणेश नलावडे संतोष बनसोडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

IMG-20251219-WA0036

IMG-20250820-WA0009