Bavdhan: बावधन वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुकीत बदल

Share This News

पुणे, दि. ४: बावधन वाहतुक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) जुना पुल पाडल्यानंतर तेथील रस्त्याच्या बाजुचे खडक फोडण्याचे काम सुरु असल्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० पासून ५ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंत वाहतूकीच्या मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे.

बावधन, हिंजवडी, देहूरोड, वाकड वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोल नाक्यापासून चांदणी चौकाकडे येण्यास बंदी करण्यात करण्यात आली आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सूस खिंड येथून चांदणी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

मुंबईकडून पुणे साताराकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवाशी चारचाकी वाहनांकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने उर्से टोलनाका येथून सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई-पुणे हायवेमार्गे भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा पुणे मार्गे जातील.

IMG-20250324-WA0012

वाकड चौकातून डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ मार्गे जाता येईल. भुमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन, औंध, शिवाजीनगर मार्गे, किवळे चौकातून रावेत, डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध, शिवाजीनगर मार्गे जाता येणार आहे. राधा चौकातून डावीकडे वळून बाणेर रोडने पुणे विद्यापीठ चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपआयुक्त आंनद भोईटे यांनी कळविले आहे.

📰 Latest News

969222
85856
WhatsApp Image 2025-05-23 at 4.18.39 PM (2