Jagdish Mulik: प्रसिद्धी साठी स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्याची राहुल गांधींना खोड आहे – जगदिश मुळीक
पुणे १८ : राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अत्यंत घृणास्पद वक्तव्यानंतर आज पुण्यात काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या जवळ काही आक्षेपार्ह फलक लावले. त्या कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे शहर प्रभारी धीरज घाटे यांच्या वतीने आज स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सावरकर यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या केलेल्या अपमानाबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की ‘ज्यांच्या पूर्वजांनी अखंड भारताचे तुकडे तुकडे केले आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर सर्व महा पुरुषांना कायम दुर्लक्षित केले, त्या राहुल गांधीच्या तोंडी भारत जोडोची भाषा शोभत नाही. विभाजनाचा वारसा मिळालेला माणूस भारत तोडू शकतो जोडू शकतं नाही. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आणीबाणी लावणारे काँग्रेस, माध्यमांवर बंदी आणणारे, सत्तर वर्षात देशाला गरिबी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची भेट देणारे काँग्रेस, सावरकरांचा त्याग, बलिदान समजू शकत नाही. तेव्हढी त्यांच्यात कुवत देखील नाही. वीर सावरकरांचा सातत्याने अपमान करण्याचं धारिष्ट्य करणाऱ्या राहुल गांधींनी आता मात्र सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
[ad id=’19970′]
भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अत्यंत क्षीण प्रतिसादाने व्यथित होऊन राहुल गांधींनी स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीने वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील जनता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान मूकपणे सहन करणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला त्यांची जागा हीच जनता दाखवून देईल असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.
यावेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक ,भाजप प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, स्मिता वस्ते, सरचिटणीस गणेश घोष, रघुनाथ गौडा, विशाल पवार, पुष्कर तुळजापूरकर, निहल घोडके यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/KSk73FAmlH78ARQf02T9dG