Wanowrie, Pune: वानवडी परिसरातील आरोग्यसेवकांना श्री.प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले

Share This News

वानवडी परिसरातील विविध आरोग्य केंद्र व दवाखान्यातील आरोग्य सेवकांना श्री प्रशांत जगताप मित्रपरिवार यांच्यावतीने दिवाळीच्या निमित्ताने मिठाईचे वाटप करत या आरोग्य सेवकांची दिवाळी गोड करण्यात आली.

यात प्रामुख्याने आझादनगर आरोग्य कोठी,जगतापनगर आरोग्य कोठी,कै.नामदेव गेनुजी शिवरकर दवाखाना,छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल केदारीनगर, सोपानबाग आरोग्य कोठी या ठिकाणी मिठाईचे वाटप करत आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

[ad id=’19569′]

गेल्या दोन वर्षांच्या कोवीड काळात परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्याबाबत ठेवण्यासाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र मेहनत घेतली आहे. आपले सण उत्सव साजरे होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडला तर तातडीने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे आरोग्य सेवक सतत फील्डवर सज्ज असतात. आपला दिवाळी उत्सव साजरा होत असताना आपल्या आनंदात या लोकांना देखील सहभागी करून घेणे हेच आपले कर्तव्य मानत असल्याचे श्री. प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून आरोग्य सेवक पोलीस कर्मचारी यांना मिठाई वाटत दिवाळी उत्सव साजरा करण्याचा हा उपक्रम खरोखर आदर्शवत असून समाजातील इतर घटकांकडून देखील याचे कौतुक होत आहे.

या मिठाई वाटप प्रसंगी शहराध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री.प्रशांत जगताप, माजी नगरसेविका सौ. रत्नप्रभाताई जगताप, प्रफुल्ल जांभुळकर, संदीप जगताप,विनोद शितोळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.