Fergusson College Pune: फर्ग्सुसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार शिकाऊ वाहन परवाना

Share This News

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रादेशिक परिवहन महामंडळ केंद्राचे (आरटीओ) उद्घाटन राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

[ad id=’18971′]

फर्ग्सुसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या केंद्राद्वारे शिकाऊ वाहन परवाना उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारे फर्ग्युसन हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे.

स्थळ – अ‍ॅम्फि-थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, फर्ग्युसन रस्ता, पुणे
वेळ – बुधवार, 14 सप्टेंबर 2022 सकाळी 11 वाजता